Yeah , i am again getting bored in the classroom, thanx to my ever irregular concentration. So i need to engage myself, here comes my best buddy: Poems...
Today i was kind of (self proclaimed) on a roll. lolz...So i scribbled few lines...here are they.
भर उन्हात चालताना पाणपोई दिसू देत,
माझ्या काटेरी स्वप्नांना तुझ्या आठवनीचे गुलाब येऊ देत ,
विझानारया दिव्याला जरासा आडोसा मिळू देत,
कधीतरी माझ्याही दारी वळवाचा पाउस पडू देत....
In between my friend was struggled to pen down his (!) thoughts...
so the inspirational lines....:)
तुझ्या कल्पनांना शब्दांचे माहेर मिळू देत,
या कोऱ्या कागदावर भावनांचे पाट वाहू देत...
work resumes....
ना कळेना
ना उमगेना
ना कुणास ठाऊक
काटा कुठे रुतलेला!
मन भरकटलेले
उलघाल संपेना
ना कुणास ठाऊक
काटा कुठे रुतलेला!
डोळे शोधिसी कुणा
या हृदयास उमजेना
ना कुणास ठाऊक
काटा कुठे रुतलेला!
भलभलनारी जखम
बधीर तनमन
ना कुणास ठाऊक
काटा कुठे रुतलेला!
ध्यास अशक्याचा
पाया कमकुवत भक्तीचा
ना कुणास ठाऊक
काटा कुठे रुतलेला!!!
PS:- Finally time flies, and i am free!