Thursday, February 28, 2013

पाणपोई

रणरणत्या  उन्हात
अवचितशी वाटणारी पाणपोई
चुकल्यासारखी
कडेस न चुकता मी उभा तळपत ….

पाणी…  , थंडगार , निळेशार पाणी
तहान शमविणारे , की त्याचा भास निर्मिवणारे
कितेक पाणपोया टाळल्यात
उभा कोरडा मात्र  हिच्यापायी ….

ओंजळ ओंजळ पाणी देणारा
एका ओंजळीची वाट पाहणारा
पण तहान हासुद्धा एक भासच
वास्तविकता भासमान ….

ओंजळीतून ठिबकणारे पाणी
हळूहळू रिती होत जाणारी
थेंबाथेंबातून मातीत मिसळणारी अगतिकता
अन भासांची आभासी पटले न दिसणारी दृष्टीहीनता ……

No comments:

Post a Comment