Showing posts with label तन्मय मी. Show all posts
Showing posts with label तन्मय मी. Show all posts

Monday, March 18, 2013

Motorcycle Diaries :Breakfast Ride



Finally, I am able to get my ass out of Pune city. Thanks to Vicky, we planned a Breakfast ride. I got up around 5 am. We left for Panshet for Sunrise.
My bull was in full flow. After some polishing , shining like a bulky fighter bull.
I love it. The speed , momentum , thumping n everything.
            We reached Khadakwasala. Clicked some pictures. Midway there was a nice spot. We decided to stop for sunrise there only. It was pristine and very beautiful.
Then we headed for Sinhgad fort, where we had breakfast.  The road was complete mess.
But we sailed.

PS: It was a nice experience. I need LED lights. 

Thursday, February 28, 2013

पाणपोई

रणरणत्या  उन्हात
अवचितशी वाटणारी पाणपोई
चुकल्यासारखी
कडेस न चुकता मी उभा तळपत ….

पाणी…  , थंडगार , निळेशार पाणी
तहान शमविणारे , की त्याचा भास निर्मिवणारे
कितेक पाणपोया टाळल्यात
उभा कोरडा मात्र  हिच्यापायी ….

ओंजळ ओंजळ पाणी देणारा
एका ओंजळीची वाट पाहणारा
पण तहान हासुद्धा एक भासच
वास्तविकता भासमान ….

ओंजळीतून ठिबकणारे पाणी
हळूहळू रिती होत जाणारी
थेंबाथेंबातून मातीत मिसळणारी अगतिकता
अन भासांची आभासी पटले न दिसणारी दृष्टीहीनता ……

Wednesday, September 19, 2012

श्वास


श्वास रोखलेला
आतल्या आत
आतड्यापर्यंत
हृदयाची धडधड सतत वृद्धिंगत

चोरटी झुलूक
स्पर्शून जाते अलगद
जातात क्षण विरून सारे
हाती उरतो कोरडा उसासा

डोळ्यातून , जमीनीतुन आरपार जाणारी नजर
आकाशातील पोकळी शोधणारी नजर
सिगारेटच्या धुरामागे स्वतालाच हरविणारी नजर
काळ्या  ठिबक्याला सतत मोठी करणारी नजर ..........


ता . क  : कविता  वाचून काहीतरी कालवाकालव व्हायला हवी, तरच काही अर्थ आहे . वांझोटया ओळी म्हणजे काळा हिरा .

Monday, September 17, 2012

तो

तो ..... मला क्वचितच भेटतो
हातात हात मिळवितो
हसतो ...बोलतो
प्रेरित वाटतो

तो..... फारच थोडा वेळ थांबतो
अवचित सर जणू
वळवाच्या पावसासारखा बरसून जातो
न सुकणारा ओलावा देवून

तो ....फारच दूरचा वाटे
अनोळखी अनेकदा
साचलेले गढूळ पाणी
आभासी प्रतिबिंब

तो ....असतो सावलीसारखा
मध्यान्हीचा सूर्य न पाहिलेला ......

Friday, August 31, 2012

प्रतिबिम्ब

 आरसा

जरी असला एक धातूचा तुकडा
तरी उधलतो सारे रंग हा
जरी स्वतालाच न पाहू शकला हा
दाखवितो इतरांचे बाह्यरंग हा

ललनांचा हा सखासोबती
वार्धक्याशीही वैर नसे
कोणीही यावे पाहुनी जावे
स्थितप्रदन्य राही हा बापुडा

रुपडे असो कितीही सुंदर
क्षणभंगूर सौंदर्याची व्यर्थता जानतो हा
जरी असेल चौकट कितीही लोभसवाणी
पारयाशी इमान राखतो हा

हवी एक दृष्टी
हवे नवे आत्मभान
आपुलेच गुणदोष नीरक्षीरन्यायाने दाखविणारा
कोणी नसे सखा यासम ....

                                                                    28/02/2010

आरसा

आरशात भलताच दूसरा कोणी
मीच मला अनोलखी
काळे डोळे, रुंद कपाळ
सावला रंग
शांत चित्र
सुंदर व गहिरे ....

निर्जीव डोळे
डोळ्यातून आत जाणारी वर्तुळ
वर्तुलातुन निघणारी अगणित अंतर्गत भोवरे
आतच आत जाणारी
खोल खोल
अंधारातून अंधाराकडे ........

मंद गहिरा श्वास
अविरत चालणारी धड़धड
कानोसा अस्पष्ट धड़धदीचा
मंद अतिमंद
हरविलेले भान
अमुर्ताचा हव्यास  ....

हवेत भिरभिरनारा मनपक्षी
उंचच उंच जाणारा
आडवा तिड़वा उड़नारा
सरळ खाली येणारा
एका डोळ्यातून दुसरया डोळ्यात पाहणारा
आराशासमोर  येताच टक लावून बघणारा ....

                                                                   28/8/2012

Friday, December 2, 2011

मन माझे आभाळ

मन माझे आभाळ ,
मन माझे आभाळ 
डोळ्यात तुझ्या शोधसे
डोळ्यात तुझ्या शोधसे
माझ्या श्वासाचे कवडसे
माझ्या श्वासाचे कवडसे
मन माझे आभाळ ,
मन माझे आभाळ ...

PS:  Last 10 mins i was thinking about what to write in PS...

विषण्णता

खोल खोल रुतत जाणारी अस्वस्थता,
अश्वत्थांम्यालाही हेवा वाटावा

उसविलेल्या सदऱ्याचीही फिकीर नाही ,
उद्विग्न मनोकल्लोलात वाटे क्षुद्र सर्वकाही

विझलेल्या विस्तवासारखी प्रतिभा ,
मुर्दाड स्थितीतली स्थितःप्रज्ञता

थिजलेला आत्मसन्मान ,
अंधकारमय स्वप्ने अन काळा सूर्य...

P S :  This one is dedicated to kavi Grace. Almost a year ago i wrote this poem.
          Today, i relived those moments while typing these words. Simply Hypnotic!!!

Thursday, December 1, 2011

गुंजारव

भ्रमराने करावी आर्जवे कुसुमाला,
कर रिती थोडी तुझी मधुशाला ! 

पण ती रसिका 
लाथाडीतसे सर्व आवेदने 
न जाणो कोण्या मस्तीत दंग 
असते करण्या प्रकाशाशी संग..

का झुरावे मग भ्रमराने?
का धाव घ्यावी कुसुमाकडे आवेगाने?
त्या वेड्यास काय ठाव ?
रविकिरणापुढे  त्यास काय भाव ?  

बसतो आस लावून,
पाहिलं एकदातरी मजकडे, 
पण ती स्वतातच असते रममाण 
करते वायूशी गुजगोष्टी तर कधी आकाशाशी नेत्रपल्लवी !

होते कल्पनेच्या अश्वावर स्वार 
करते स्वर्गविहार,
भ्रमरालाही हौस भारी 
पण नाही परवडत ही सवारी.

झाले जड नयन जरी 
आले जरी अंधारून तरी 
आस त्याला मोठी भारी 
येईल साद कधीतरी...
 
होतात तिन्हीसांजा 
पाखरे जातात आपल्या घरा
सुरज जाई दुसऱ्या गावा
वाराही झोपी जावा 

वाटे तिला अनंत एकांत 
पडते मग भविष्याची भ्रांत 
येते मग आठवण भ्रमराची त्या निष्ठुर  हृदयाला ,
देती साद त्याला , घे शोषून मजला 

किंतु  त्याने आता गुंडालीला असतो आपुला गाशा 
हाती असते रिते मधुकुंभ व साथी असते फक्त निराशा...


Friday, August 19, 2011

!!! सरकारनामा !!!

( आली आली रे भागाबाईच्या तालावर )

सरकारला वाटले , कोण हा अण्णा ?
अरे उडवून टाकू याचा सहज फन्ना !
कीतेक आले  अन कीतेक गेले
सारे काही व्यर्थ वाचाल ठरले
पण जेव्हा अन्नाची शक्ती दीसली
तेव्हा सरकारची वीतभर वासली!!!
आली रे आली , सरकारची बारी  आली ...

सरकारला वाटले , काय हे लोकपाल ?
अरे उतार दुंगा  इस्की खाल !
हे बील इतके सारे फीरवू
बघता  बघता सार्यांना वेड्यात काढू .
जेव्हा जन्लोक्पाल्चे तारे दीसले
सरकारचे  मोठ्ठाले डोळे वासले !!!
आली रे आली , सरकारची बारी  आली ..


सरकारला वाटले , कसले हे उपोषण ?
येता जाता , जो तो देतो भाषण !
पोलीसयांच्या आडून करी वार गुपचुप
पण झाले चारीमुंड्या चीत
हे   सावैधानीक अन् ते असावैधानीक ,
घोड्याला गाढव म्हणण्याची
ही पद्धत भारी आधुनीक !!!
आली रे आली , सरकारची बारी  आली ..

सरकारला वाटले , कशाला पाहीजे मैदान
हा तर गल्लीबोलातला खेळ
उडवून टाकु याची दाणादाण
हे पाहीजे , अन् ते पाहीजे
गप बसता का , नाहीतर पाहिजे रत्टे
जेव्हा रामलीलावर दीसेल ताकद जबरी
सरकारला येईल जागीच घेरी!!!
आली रे आली , सरकारची बारी  आली ..
आली रे आली , सरकारची बारी  आली ..

                                          
                                           नचिकेत
 

Tuesday, June 8, 2010

मदिरा

जमले होतो मित्र तीन 
होतो एकमेकांच्या सुख -दुक्खात लीन
वेळ होती रात्रीची 
होती मदिरा साथीला 

वातावरण होते सुमधुर 
होण्यास बेहोष होतो आतुर 
संगीत होते रजनीला
बैठकाही होती सज्ज


भरले चषक
उठले चीत्कार
विसरले सर्व हेवेदावे क्षनापुरते

तनही जाले हलके
मनही जाले बंधनमुक्त करण्या विहार

चशकामागुन चषक जात होते रिचवाले
मनोराज्ये सजावली जात होती
तोडून टाकली सर्व बंधने
जाल्या पुसट सीमा  राज्यांच्या
जाला होता हरेकजन
नरेश स्वताच्या साम्राज्याचा !

PS: This was the poem i had written when i did cheers for the first time( k, i did only once after that..he he)
      * since now i am reading highly intellectual( according to me) book, i am contemplating the prospects of not having a drink again. The reason why  did i booze  totally different. Now decided work according to situation(god! what am i writing, i am hanged)

Sunday, May 30, 2010

नकळत

नकळत उभारते रोमांच रोमारोमात
अन शहरते अंगांग
न जाणो कोण्या कल्पनाविलासात
होतो मी दंग

नकळत जाते नजर तिच्याकडे
जेंव्हा सारते ती बट डोल्यावारील
देतात दगा डोळे, साले
जरी असतील आपुले

नकळत होतो स्पर्ष तिचा
जेंव्हा देते मजला ती टाली
त्या स्पर्शाला नसतो वास कोण्या वासनेचा
तरी चुकतो ठोका मात्र हृदयाचा!

नकळत घेतला जातो हात तिचा हातात
तव नयनालिपी अवतरते संभाशनात
उठतात तरंग एकाच वारंवारातेचे
तेंव्हा नकलाताही सारे कलते.