श्वास रोखलेला
आतल्या आत
आतड्यापर्यंत
हृदयाची धडधड सतत वृद्धिंगत
चोरटी झुलूक
स्पर्शून जाते अलगद
जातात क्षण विरून सारे
हाती उरतो कोरडा उसासा
डोळ्यातून , जमीनीतुन आरपार जाणारी नजर
आकाशातील पोकळी शोधणारी नजर
सिगारेटच्या धुरामागे स्वतालाच हरविणारी नजर
काळ्या ठिबक्याला सतत मोठी करणारी नजर ..........
ता . क : कविता वाचून काहीतरी कालवाकालव व्हायला हवी, तरच काही अर्थ आहे . वांझोटया ओळी म्हणजे काळा हिरा .
No comments:
Post a Comment