Thursday, December 1, 2011

गुंजारव

भ्रमराने करावी आर्जवे कुसुमाला,
कर रिती थोडी तुझी मधुशाला ! 

पण ती रसिका 
लाथाडीतसे सर्व आवेदने 
न जाणो कोण्या मस्तीत दंग 
असते करण्या प्रकाशाशी संग..

का झुरावे मग भ्रमराने?
का धाव घ्यावी कुसुमाकडे आवेगाने?
त्या वेड्यास काय ठाव ?
रविकिरणापुढे  त्यास काय भाव ?  

बसतो आस लावून,
पाहिलं एकदातरी मजकडे, 
पण ती स्वतातच असते रममाण 
करते वायूशी गुजगोष्टी तर कधी आकाशाशी नेत्रपल्लवी !

होते कल्पनेच्या अश्वावर स्वार 
करते स्वर्गविहार,
भ्रमरालाही हौस भारी 
पण नाही परवडत ही सवारी.

झाले जड नयन जरी 
आले जरी अंधारून तरी 
आस त्याला मोठी भारी 
येईल साद कधीतरी...
 
होतात तिन्हीसांजा 
पाखरे जातात आपल्या घरा
सुरज जाई दुसऱ्या गावा
वाराही झोपी जावा 

वाटे तिला अनंत एकांत 
पडते मग भविष्याची भ्रांत 
येते मग आठवण भ्रमराची त्या निष्ठुर  हृदयाला ,
देती साद त्याला , घे शोषून मजला 

किंतु  त्याने आता गुंडालीला असतो आपुला गाशा 
हाती असते रिते मधुकुंभ व साथी असते फक्त निराशा...


2 comments: