घेतलेल्या आणाभाका ती सुद्धा विसरली
साथसंगत विसंगत वाटू लागली
आप्तस्वकीय पाठ दावुन पलाले
राहिलेले शर्करामिश्रित जहर देवू लागले
सोबतीही अंतर ठेवू लागले
चेहरा पाहून, तोंड फिरवू लागले
भासे केवढा केविलवाणा प्रयत्न त्यांचा
वाटे अतीव कीव त्यांची
जरी देती अंतरे सारी
ती न सोडी साथ माझी
रोमारोमात सलसलते
कविता फक्त माझी...
nachya kavita koon.... hmmmmm. neways nice one . keep going
ReplyDelete