Friday, December 2, 2011

मन माझे आभाळ

मन माझे आभाळ ,
मन माझे आभाळ 
डोळ्यात तुझ्या शोधसे
डोळ्यात तुझ्या शोधसे
माझ्या श्वासाचे कवडसे
माझ्या श्वासाचे कवडसे
मन माझे आभाळ ,
मन माझे आभाळ ...

PS:  Last 10 mins i was thinking about what to write in PS...

विषण्णता

खोल खोल रुतत जाणारी अस्वस्थता,
अश्वत्थांम्यालाही हेवा वाटावा

उसविलेल्या सदऱ्याचीही फिकीर नाही ,
उद्विग्न मनोकल्लोलात वाटे क्षुद्र सर्वकाही

विझलेल्या विस्तवासारखी प्रतिभा ,
मुर्दाड स्थितीतली स्थितःप्रज्ञता

थिजलेला आत्मसन्मान ,
अंधकारमय स्वप्ने अन काळा सूर्य...

P S :  This one is dedicated to kavi Grace. Almost a year ago i wrote this poem.
          Today, i relived those moments while typing these words. Simply Hypnotic!!!

Thursday, December 1, 2011

गुंजारव

भ्रमराने करावी आर्जवे कुसुमाला,
कर रिती थोडी तुझी मधुशाला ! 

पण ती रसिका 
लाथाडीतसे सर्व आवेदने 
न जाणो कोण्या मस्तीत दंग 
असते करण्या प्रकाशाशी संग..

का झुरावे मग भ्रमराने?
का धाव घ्यावी कुसुमाकडे आवेगाने?
त्या वेड्यास काय ठाव ?
रविकिरणापुढे  त्यास काय भाव ?  

बसतो आस लावून,
पाहिलं एकदातरी मजकडे, 
पण ती स्वतातच असते रममाण 
करते वायूशी गुजगोष्टी तर कधी आकाशाशी नेत्रपल्लवी !

होते कल्पनेच्या अश्वावर स्वार 
करते स्वर्गविहार,
भ्रमरालाही हौस भारी 
पण नाही परवडत ही सवारी.

झाले जड नयन जरी 
आले जरी अंधारून तरी 
आस त्याला मोठी भारी 
येईल साद कधीतरी...
 
होतात तिन्हीसांजा 
पाखरे जातात आपल्या घरा
सुरज जाई दुसऱ्या गावा
वाराही झोपी जावा 

वाटे तिला अनंत एकांत 
पडते मग भविष्याची भ्रांत 
येते मग आठवण भ्रमराची त्या निष्ठुर  हृदयाला ,
देती साद त्याला , घे शोषून मजला 

किंतु  त्याने आता गुंडालीला असतो आपुला गाशा 
हाती असते रिते मधुकुंभ व साथी असते फक्त निराशा...