आरसा
जरी असला एक धातूचा तुकडा
तरी उधलतो सारे रंग हा
जरी स्वतालाच न पाहू शकला हा
दाखवितो इतरांचे बाह्यरंग हा
ललनांचा हा सखासोबती
वार्धक्याशीही वैर नसे
कोणीही यावे पाहुनी जावे
स्थितप्रदन्य राही हा बापुडा
रुपडे असो कितीही सुंदर
क्षणभंगूर सौंदर्याची व्यर्थता जानतो हा
जरी असेल चौकट कितीही लोभसवाणी
पारयाशी इमान राखतो हा
हवी एक दृष्टी
हवे नवे आत्मभान
आपुलेच गुणदोष नीरक्षीरन्यायाने दाखविणारा
कोणी नसे सखा यासम ....
28/02/2010
आरसा
आरशात भलताच दूसरा कोणी
मीच मला अनोलखी
काळे डोळे, रुंद कपाळ
सावला रंग
शांत चित्र
सुंदर व गहिरे ....
निर्जीव डोळे
डोळ्यातून आत जाणारी वर्तुळ
वर्तुलातुन निघणारी अगणित अंतर्गत भोवरे
आतच आत जाणारी
खोल खोल
अंधारातून अंधाराकडे ........
मंद गहिरा श्वास
अविरत चालणारी धड़धड
कानोसा अस्पष्ट धड़धदीचा
मंद अतिमंद
हरविलेले भान
अमुर्ताचा हव्यास ....
हवेत भिरभिरनारा मनपक्षी
उंचच उंच जाणारा
आडवा तिड़वा उड़नारा
सरळ खाली येणारा
एका डोळ्यातून दुसरया डोळ्यात पाहणारा
आराशासमोर येताच टक लावून बघणारा ....
28/8/2012
जरी असला एक धातूचा तुकडा
तरी उधलतो सारे रंग हा
जरी स्वतालाच न पाहू शकला हा
दाखवितो इतरांचे बाह्यरंग हा
ललनांचा हा सखासोबती
वार्धक्याशीही वैर नसे
कोणीही यावे पाहुनी जावे
स्थितप्रदन्य राही हा बापुडा
रुपडे असो कितीही सुंदर
क्षणभंगूर सौंदर्याची व्यर्थता जानतो हा
जरी असेल चौकट कितीही लोभसवाणी
पारयाशी इमान राखतो हा
हवी एक दृष्टी
हवे नवे आत्मभान
आपुलेच गुणदोष नीरक्षीरन्यायाने दाखविणारा
कोणी नसे सखा यासम ....
28/02/2010
आरसा
आरशात भलताच दूसरा कोणी
मीच मला अनोलखी
काळे डोळे, रुंद कपाळ
सावला रंग
शांत चित्र
सुंदर व गहिरे ....
निर्जीव डोळे
डोळ्यातून आत जाणारी वर्तुळ
वर्तुलातुन निघणारी अगणित अंतर्गत भोवरे
आतच आत जाणारी
खोल खोल
अंधारातून अंधाराकडे ........
मंद गहिरा श्वास
अविरत चालणारी धड़धड
कानोसा अस्पष्ट धड़धदीचा
मंद अतिमंद
हरविलेले भान
अमुर्ताचा हव्यास ....
हवेत भिरभिरनारा मनपक्षी
उंचच उंच जाणारा
आडवा तिड़वा उड़नारा
सरळ खाली येणारा
एका डोळ्यातून दुसरया डोळ्यात पाहणारा
आराशासमोर येताच टक लावून बघणारा ....
28/8/2012