Thursday, April 29, 2010

मन पाखरू पाखरू

कधी भूतलावर
तर कधी दूर आकाशात
कधी वास्तवात
तर कधी कविराज्यात
मन पाखरू पाखरू
जसा बेभान हा वारु

कधी रमते रम्य संध्याकाळी
कधी होते मलूल हर्शवेली
ना चालेल मात्रा यास कोण्या दवादारुची
हावी यास मोकालिक फ़क्त धुंद हवेची
मन पाखरू पाखरू
जसा बेभान हा वारु

काय हवे
अन काय नको
बदलते क्षणोक्षणी
उत्तर देता देता थकेलाही चक्रपाणि
मन पाखरू पाखरू
जसा बेभान हा वारु

जरी असेल प्रबल इच्छा
तरी घेते अनंत आढेवेढे
ना कुणास ठावुक असे का होते
जसे कही न सुतनारे कोड़े
मन पाखरू पाखरू
जसा बेभान हा वारु

2 comments:

  1. प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
    कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
    विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
    आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

    ReplyDelete